नाशिक तालुक्यात एकूण 211 शाळा आहेत त्यापैकी 107 जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळा आहे यामध्ये 12569 विद्यार्थी शिक्षण घेत आहे.
नाशिक तालुक्यात 5 बीट असून 11 केंद्र आहे. तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी संवाद, स्पर्धा परीक्षासाठी भरारी उपक्रम घेतले जातात.
२०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षण निर्देशांकात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी राहिला आहे. (येथे क्लिक करा, पृष्ठ १५) भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या चौथ्या कामगिरी प्रतवारी निर्देशांकानुसार महाराष्ट्राला एकूण ९२८/१००० गुण मिळाले आहेत. या गुणांसह राज्याने गेल्या वर्षीच्या आठव्या क्रमांकावरून अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. शालेय शिक्षण संबंधी सकारात्मक परिवर्तनाचे मोजमाप करणाऱ्या या निर्देशांकानुसार केरळ आणि पंजाबसह महाराष्ट्र पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे.
राज्यातील शिक्षण हक्क कायद्यांतर्गत ६ ते १४ वयोगटातील मुलांसाठी सरकारी तसेच सरकारी अनुदानित शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे आहे.राज्यात प्राथमिक शिक्षण हा संपूर्ण औपचारिक शिक्षण प्रक्रियेचा पाया मानला जातो. वयाच्या सहाव्या वर्षापूर्वीच्या शिक्षणाला पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणतात. पूर्व-प्राथमिक शिक्षण दोन वर्षांचे असते आणि त्याला लहान शिशुवर्ग आणि मोठा शिशुवर्ग म्हटले जाते. इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या शिक्षणाला प्राथमिक शिक्षण, इयत्ता सहावी ते आठवीला उच्च प्राथमिक शिक्षण तर इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शिक्षणाला माध्यमिक शिक्षण म्हणतात.